अकोल्यात अॅड. प्रकाश आंबेडकरांविरुद्ध ‘बौद्धां’चे बंडाचे निशाण
अकोल्यातील बौद्ध समाज पक्षातच ‘वंचित’ असल्याने आंबेडकरांचा बौद्ध जनाधार सैल झाला आहे. निवडणुकीत भाजप, सेना, काँग्रेस किंवा राष्ट्रवादीची उमेदवारी घेणे, त्यांची पदे घेणे, वंचितच्या विरुद्ध प्रचारात बौद्ध वस्त्यांत फिरणे, त्यांना आपल्या बाजूला वळवणे हे बौद्ध पदाधिकारी यांनी सुरू केले आहे. बौद्ध समाजाने घेतलेला पवित्रा आंबेडकरांच्या बालेकिल्याला पडलेले मोठे भगदाड आहे.......